आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांच्या भांडणातून तणाव; वंजारगल्लीत दोन दुचाक्या जाळल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील वंजारगल्ली भागात शुक्रवारी दुपारी युवकांंच्या दोन गटांत धुमश्चक्री झाली. लहान मुलांचा गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद वाढत गेल्याने संतप्त जमावाने दोन दुचाक्या जाळल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. आडते बाजारासह वंजारगल्लीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. या दंगलीत सहा जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 

 

वंजारगल्ली भागात दुपारच्या सुमाराला लहान मुलांचा गाडीचा धक्का लागला. त्या किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद उद््भवला. त्यामुळे तेथे गर्दी गोळा झाली. जमाव वाढल्यानंतर दोन गटात हाणामारीला सुरुवात झाली. काहीजणांनी दगडफेकही केली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाळा. वंजारगल्ली व आडते बाजारातील व्यापाऱ्यांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मोठा फौजफाटा दाखल झाला, पण तोपर्यंत जमावाने दोन दुचाक्यांना आग लावली होती. 

 

घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल येईपर्यंत गाड्या जळून खाक झाल्या. घटनास्थळी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन गोकावे फौजफाट्यासह दाखल झाले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर जमाव पांगला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल घटनास्थळी दाखल झाले. 

 

पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. परिसरात तणाव निर्माण झाल्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी दंगलखोरांचा शोध सुरु केला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, लहान मुलांच्या किरकोळ वादातून ही हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितलेे. 

 

घटनेत सहा जण जखमी 
क्षुल्लक कारणावरून वाद वाढल्याने संतप्त जमावाने दुचाक्या जाळल्या.