आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील दगडाच्या खाणीत जिलेटीन स्फोट, दोन चिमुकल्या भावांचा जागीच मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यातील वलखेडामधील जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिवम धोत्रे(9) आणि शिवराज धोत्रे(7) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे.


जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे आणि त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम करत होते. काल(21 मे) रवींद्र धोत्रे हे आपल्या दोन्ही मुलांसोबत दगडीच्या खाणीजवळ गेले होते. दुपारी रणरणतं ऊन असल्याने ते दोघेही दगडाच्या खाणीजवळ बसले, पण त्याचदरम्यान अचानक जिलेटीनचा स्फोट झाला आणि स्फोटामुळे खाणीजवळ टेकून बसलेले शिवम आणि शिवराज दोघेही दहा फूट अंतरावर उडाले. हा स्फोट इतका तीव्र होता की, या दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने रवींद्र धोत्रे आणि त्यांची पत्नी खाणीजवळील ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजूला दगड भरण्याचे काम करत असल्याने त्यांचा जीव वाचला


धोत्रे कुटुंब हे बीडमधील गेवराई तालुक्यातील संगम जळगाव या गावात राहतात. गेल्या दोन महिन्यांपासून ते काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या जालन्यातील अबंड तालुक्यातील वलखेडा शिवारात दगड खाणीवर दगड फोडण्याचे काम करत होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृत बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...