आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर (मध्य प्रदेश) - येथे बोलणे बंद केले म्हणून दोन ऑटो चालक भावांनी एका युवतीला जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे कपडे फाडत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी दोन साक्षीदार आणण्यास सांगितले. साक्षीदारांनी उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
इंदूर येथे युवती रस्त्याने जात असताना दोन ऑटो चालक भावांनी तिचा मोबाइल हिसकावून घेतला. युवती त्यांच्या मागे धावली तेव्हा त्यांनी तिला ऑटोत बसवले. तिचे कपडे फाडून सिगारेटने तिच्या हातावर चटके दिले. तसेच तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरोप केला आहे की, मी त्या दोघांना ओळखते. मी त्यांच्याशी बोलणे बंद केले तर त्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यातील एकाने माझ्याशी लग्न कर म्हणत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मी कसेबसे दोघांच्या तावडीतून सुटका करून घेतली.
दोन प्रत्यक्षदर्शी आणल्यानंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीने आरोप केली की, तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी मला साक्षीदार आणण्यास सांगितले. ते म्हणाले की घटना पाहणाऱ्या दोन लोकांना घेऊन ये. युवतीचे म्हणणे आहे की, जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा कोण पाहत होते हे मला कसे माहीत असणार. पण तरी मी नंतर माझ्या कुटुंबीयांच्या मदतीने दोन साक्षीदारांना शोधून आणले. यानंतर पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेतली.
पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपींनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे. दोघांची शुक्रवारी संध्याकाळी तुरुंगात हकालपट्टी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.