आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 सख्खे भाऊ 4 वर्षांपासून लुटत होते बहिणीची अब्रू, मुलीने लपवून शूट केला Video; मग समोर आले घरातील सैतान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - शहरात बलात्काराचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यात अवघ्या बारावीला असलेल्या एका मुलीने आपल्याच दोन सख्ख्या भावांवर बलात्काराचे आरोप लावले आहेत. गेल्या 4 वर्षांपासून घरातच राहणारे हे सैतान तिची अब्रू लुटत होते. पीडितेने सांगितल्याप्रमाणे, लहानपणाचा गैरफायदा घेत त्यांनी अत्याचार केले. प्रत्येकवेळा रेप केल्यानंतर ते ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जीवे मारणार अशी धमकी द्यायचे. कसे-बसे तिने आपल्यावर घडलेल्या अत्याचाराचा मोबाईलमध्ये लपवून व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ घेऊन ती एका एनजीओकडे पोहोचली आणि दोघांना पोलिसांच्या हवाली केले. 


आरोप लावण्यापूर्वी गोळा केले पुरावे...
- हे प्रकरण मेरठ जिल्ह्यातील सिव्हिल लाइन्स पोलिस हद्दीचे आहे. या परिसरातील एका अल्पवयीन मुलीने बुधवारी पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार केली. तिने केलेल्या आरोपानुसार, तिचे 2 सख्खे भाऊ घरातच गेल्या 4 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत होते. हे नाते असे आहे, की कुणीही सख्ख्या भावांवर लावलेल्या आरोपांवर विश्वास ठेवला नसता. त्यामुळेच, आरोप लावण्यापूर्वी आपण पुरावे गोळा केले असे तिने पोलिसांना सांगितले. 
- जगातील सर्वात पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच हैराण केले. एनजीओच्या सदस्यांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेलेल्या या मुलीने आपल्या भावांच्या कृत्याचा व्हिडिओ देखील पोलिसांसमोर सादर केला. नेहमीच हे सख्खे भाऊ तिच्यावर अत्याचार करून कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे. परंतु, एक दिवस तिने हिंमत दाखवून संपूर्ण अत्याचाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...