आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याहून दुचाकीने निघालेली भावंडे क्रुझरने धडक दिल्याने जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद- घरकुलचे सर्वेक्षण होणार असल्यामुळे पुणे येथून दुचाकीवरून येताना नगर जिल्ह्यातील नेवासा फाट्याजवळ क्रूझर गाडीने दिलेल्या धडकेत जाफराबाद तालुक्यातील टाकळी गावातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. राजू रखमाजी बागल (२३), विकास रखमाजी बागल (२०) अशी मृतांची नावे आहेत. 


जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथील राजू बागल, विकास बागल हे दोघेही भाऊ पुणे येथे कंपनीत नोकरीस होते. यामुळे हे दोघेही भाऊ पुणे येथे राहत होते. दोघांचेही लग्न झालेले असून त्यांच्या पत्नी गावाकडे राहत होत्या. गावाकडे घरकुलाचे सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळाली. यामुळे सोमवारी हे दोघेही भाऊ तातडीने पुणे येथून दुचाकीवरून गावाकडे येत होते. रात्री २ वाजेच्या सुमारास नगर जिल्ह्यातील नेवासा फाट्याजवळ आले असता भरधाव येणाऱ्या क्रूझरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही ठार झाले. अपघातानंतर त्यांचे मृतदेह गावाकडे आणून त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे टाकळी गावावर शोककळा पसरली. दोघाही भावांच्या पत्नी ह्या गावाकडे होत्या. एकाचे गतवर्षीच लग्न झालेले होते. एकास एक मुलगा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...