आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक वादातून लातूरमध्ये दोन चिमुकल्यांचा अपहरणानंतर खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी भागातून चार दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या दोन चिमुकल्यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांचेही मृतदेह लातूरनजीकच्या बुधोडा येथे आढळून आले.  इरफान अशफाक पठाण (७) वर्षे व जुनेद अशफाक पठाण (४) अशी या मुलांची नावे आहेत. मुलांच्या वडिलांशी झालेल्या आर्थिक वादातून त्यांच्या दोन्ही मुलांचा खून केल्याची कबुली आरोपी बालाजी राठोड याने दिली आहे.  

या चिमुकल्यांची आई रेश्मा अशफाक पठाण या १३ तारखेला सकाळी १० वाजता दोन्ही मुलांना घरी ठेऊन कामाला गेलेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता त्या घरी परत आल्यानंतर त्यांना घरात इरफान व जुनेद दिसले नाहीत.  त्यांनी आपल्या पतीला फोनवरून माहिती देऊन शहरात सर्वत्र शोधाशोध केली. परंतु मुलांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. १४ रोजी त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. दोन दिवस काहीच शोध लागला नाही. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी बालाजी राठोड यास अटक करून चौकशी केली. त्यात बालाजी याने दोघांच्या खुनाची कबुली दिली.