आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिकागो - अमेरिकेतील मायामी बीचवर दोन ख्रिस्ती धर्मगुरूंना अटक करण्यात आली आहे. मायामी बीचच्या रस्त्यावर भरदिवसा हे दोघे आपली कार पार्क करून त्यामध्ये ओरल सेक्स करत होते. डिएगो बेरिओ (39) आणि एडविन कोर्टेझ (30) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांच्या विरोधात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि समाजविरोधी कृत्य, सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन केल्याचे आरोप दाखल केले आहेत. बीचवर फिरणाऱ्या एका नागरिकाने सर्वप्रथम हे अश्लील कृत्य पाहून पोलिसांना सतर्क केले. यानंतर वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना अटक केली.
कारला पारदर्शक काचा, जवळच होते मुलांचे मैदान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फोनवर एका स्थानिकाने भरदिवसा कारमध्ये अश्लील कृत्य सुरू असल्याची तक्रार केली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा देखील त्यांनी आपले कृत्य सुरूच ठेवले होते. कारच्या काचा पूर्णपणे पारदर्शक होत्या. त्यावर काळी फ्रेम सुद्धा नव्हती. त्यामुळे, आतील दोघे सर्वांना स्पष्ट दिसून येत होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या शेजारीच लहान मुलांचे मैदान होते. तरीही आरोपींनी त्याची काहीच तमा बाळगली नाही. यानंतर पोलिसांनी कारची खिडकी वाजवली आणि दोघांना बाहेर बोलावले.
म्हणाले, आम्ही धर्मगुरू आहोत; हे होते पोलिसांचे उत्तर...
पोलिस कारबाहेर आल्याचे पाहून दोघेही घाबरले आणि आपले कपडे घालून बाहेर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली तेव्हा त्यापैकी एक म्हणाला, "आम्ही धर्मगुरू आहोत. शिकागोच्याच एका चर्चमध्ये आम्ही काम करतो." त्यावर पोलिस म्हणाले, "तुम्ही धर्मगुरू असाल किंवा इतर काहीही असाल याच्याशी तुमच्या कृत्याचा आणि अटकेचा काहीच संबंध नाही. प्रत्येक गोष्ट करताना त्यानुसार ठिकाण आणि वेळ पाहणे आवश्यक आहे. भरदिवसा अशा प्रकारचे अश्लील वर्तन खपवून घेतले जाणार नाही. शेजारीच लहान मुले मैदानात खेळत होती. अटक तर होणारच." यानंतर त्यापैकी एक आरोपी डिएगोची 250 अमेरिकन डॉलर (18000 रुपये) आणि मुख्य आरोपी कोर्टेझची 1500 अमेरिकन डॉलरच्या (1 लाख रुपये) जामिनावर सुटका करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.