आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूममध्ये पातेल्यात पडून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू; धुळे तालुक्यातील दुर्दैवी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडणे- तालुक्यातील उडाणे येथे खेळता-खेळता पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. निकिता (३ वर्षे) व ज्ञानेश्वरी पाटील (दीड वर्षे) असे मृत बहिणींचे नाव आहे. 


तालुक्यातील उडाणे येथील निकिता भाऊसाहेब पाटील (३ वर्षे) व ज्ञानेश्वरी भाऊसाहेब पाटील (दीड वर्षे) या दोन्ही बहिणी रविवारी घरात खेळत होत्या. तब्येत बरी नसल्याने त्यांची अाई राणीबाई या घरच्या पुढच्या खोलीत अाराम करत होत्या. तसेच अाजीही घरच्या पुढच्या भागात घरकामात व्यग्र होत्या. त्या वेळी निकिता व ज्ञानेश्वरी या दोन्ही बहिणी खेळता-खेळता बाथरूमकडे गेल्या. खेळताना त्या अचानक पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुलींचे वडील भाऊसाहेब अण्णा पाटील हे शेतीकाम व खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यामुळे तेही बाहेरच होते. घरात मुलींची चाहूल लागत नसल्याचे लक्षात आल्यावर राणीबाईंना जाग अाली. त्यांनी घरात जाऊन बघितल्यानंतर दोन्ही मुली पातेल्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली अाहे. भाऊसाहेब पाटील व राणीबाई दोन्ही मुलांचे मुलाप्रमाणे लाड करत होते. 

बातम्या आणखी आहेत...