आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक आणि स्कूल बस यांच्यात भीषण अपघात, बसच्या उडाल्या चिंधड्या; चाकाखाली आल्यामुळे दोन मुलांच्या डोक्याचा झाला चेंदामेंदा, अस्ताव्यस्त पडले होते स्कूलबॅग आणि टिफिन बॉक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करनाल (हरियाणा) : हरियाणातील करनाल जवळ ट्राली आणि स्कूलबस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. गुरूवारी सकाळी 8 वाजते दाट धुक्यामुळे ट्रकला ओवरटेक करत असलेली ट्राली समोरून येणाऱ्या सेंट सिमरन पब्लिक स्कूलच्या बसवर धडकली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागेवर मृत्यू झाला असून 10 मुले आणि एक महिला जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या बस चालकाचे पाय तोडावे लागले. 


प्रत्यक्षदर्शीने सांगितले किती वेदनादायक होता अपघात

गुरूवारी झालेल्या या अपघातात दोन मुलांच्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामुळे त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते. शाळेच्या ओळखपत्राआधारे त्यांची ओळख पटली आहे. प्रत्यक्षदर्शी सतबीरने सांगितले की, तो गाडीने जात असाताना त्याच्यासमोर स्कूलबस जात होती. दरम्यान ट्रकला ओवरटेक करत असलेली ट्राली सेंट सिमरन पब्लिक स्कूलच्या बसवर जाऊन धडकली. यामध्ये बसचा चुराडा झाला होता. बसच्या काचा फुटल्यामुळे मुले रस्त्यावर पडून ट्रालीच्या चाकाखाली आली होती. मुलांचे दप्तर इतरत्र अस्थाव्यस्त पडले होते. या भीषण अपघातात 10वीचा विद्यार्थी साहिल (17) आणि 5वीचा विद्यार्थी यशमीत (11) यांचा ट्रालीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. सतबीर मुलांना सांभाळत असताना दोन्ही मुलांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता आणि 10-12 मुले जखमी झाले होते. बस चालकाला देखील जबर मार लागला होता. 

 

जमावाने ट्रक पेटवला, विझवण्यास केला मज्जाव

दोन मुलांच्या मृत्यूनंतर लोकांना रागाचा पारा वाढला. जमावाने ट्रक पेटवला होता. ट्रकची आग विझवण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल असता लोकांनी आग विझवण्यास मज्जाव केला. दरम्यान दोन डीएसपी, तीन एसएचओ सहित 50 पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर होते. या दरम्यान जमावाने वाळू भरलेल्या 10 ट्रकांची तोडफोड केली  

 

यामुळे या मार्गावर होत आहेत दुर्घटना
दुर्घटनेनंतर डीसीने आयोजित होणारी रस्ते सुरक्षा बैठक स्थगित केली. घटनेच्या मागचे कारणाचा तपास सुरु आहे. या मार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. याशिवाय रस्त्याच्या दोन्हीबाजूने दरी असल्यामुळे दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रशासन रस्ते सुरक्षेच्या होणार्या आगामी बैठकीत सुधारणेवर विचार विनिमय करू शकते. तर दूसरीकडे ज्या शाळेतील मुलांचा अपघात जीव गेला. त्या शाळेला सोमवार पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...