Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Two children die after DCG and DPD preventive immunization, both serious

डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू, दोघे गंभीर

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 07:15 AM IST

आरोग्य पथकाकडून रात्री उशिरापर्यंत घटनेची चौकशी केली जात होती.

  • Two children die after DCG and DPD preventive immunization, both serious

    परभणी - पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर प्रत्येकी ३ महिन्यांच्या गोपाळ रामकिशन सकनूर, राम निळे या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर विद्या भकाणे, लखण निळे या बालकांवर अंबेजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    रोकडेवाडीतील आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी बुधवारी सकाळी काही बालकांचे लसीकरण केले. सकाळी ११ वाजता गोपाळचा मृत्यू झाला.

    व्यंकटेश श्यामराव निळे यांची जुळी मुले राम-लखण व दत्तराव रावजी भकाणे यांची मुलगी विद्या या तीन बालकांनाही लस टोचण्यात आली. या तिघांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र रावराजूर येथे नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रामचा मृत्यू झाला. तर लखण व विद्याला अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. या बालकांवर डॉ. श्रीमती देशमुख , डॉ. शेख , डॉ. अविनाश पवार, डॉ, धापसे, माला घोबाळे, गायकवाड आदींनी उपचार केले. आरोग्य पथकाकडून रात्री उशिरापर्यंत घटनेची चौकशी केली जात होती.

Trending