आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS कार्यकर्त्याच्या घरात बॉम्बस्फोट; 2 चिमुकले जखमी, 7 तलवारींसह कुऱ्हाड आणि शस्त्रसाठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुन्नूर - केरळमध्ये एका घरात शनिवारी देसी बनावटीचा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 2 चिमुकले जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोट झाला ते घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य काथिरुम्मल शिबू यांचे होते. तसेच जखमी झालेल्या मुलांमध्ये एम.एस. गोकुल (8) हा त्यांचाच मुलगा आहे. तर दुसरा मुलगा त्यांच्या मुलाचा मित्र आहे. ही घटना कुन्नूर जिल्ह्यातील नाडुविल परिसरात घडली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात स्फोटक पदार्थ विरोधी कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिबू यांच्या घरात त्यांचा मुलगा गोकुल आणि त्याचा मित्र खेळत होते. त्याचवेळी अचानक बॉम्बस्फोट घडला. मीडिया रिपोर्टनुसार, हे बॉम्ब देसी बनावटीचे होते तसेच ते एका चिमणीच्या घरट्यात ठेवण्यात आले होते. स्फोटाचा आवाज ऐकून आस-पासच्या लोकांनी घरात गर्दी केली. त्यापैकीच काहींनी गोकुल आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांच्या कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी घरात झडती घेतली तेव्हा घरातील एका शेडमध्ये सात तलवारी, एक कुऱ्हाड, लोखंडी सळ्या आणि इतर साहित्य सापडले आहेत. जखमी झालेली मुले याच घरात खेळत होती. या स्फोटानंतर परिसरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...