Home | Maharashtra | Pune | Two children's crushed by pickup in Mumngashi

मुंगशीत दोघा चिमुरड्या भावंडांना दुधाच्या पिकअपने चिरडले, घराबाहेर खेळत असताना घडली घटना; गावात आक्रोश

प्रतिनिधी, | Update - Jun 18, 2019, 10:37 AM IST

पिकअप मागे वळवत असताना चालकाने लक्ष न दिल्यामुळे घडली दुर्घटना

  • Two children's crushed by pickup in Mumngashi


    माढा - आपली मुले अंगणात खेळताहेत म्हणुन गाफिल न राहता त्यांच्या कडे लक्ष द्या कारण घराच्या बाहेर अंगणात खेळणाऱ्या दोघा चिमुरड्या भावंडाना पिक अपने चिरडले. दुधाचे पिकअप मागे घेत असताना दोन चिमुकल्यांचा गाडीच्या चाकाखाली चिरडुन मृत्यू झाल्याची हद्ययद्रावक घटना माढा तालुक्यातील मुंगशी गावात आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली. आरवी तात्यासाहेब काळे (वय वर्षे 3) तर मुलगा जय तात्यासाहेब काळे (वय वर्ष दोन) अशी मृत्यु झालेल्या भावंडाची नावे आहेत.

    गावात शेतकर्याचे दुध घेऊन जाण्यासाठी पिकअप येतो. घराच्या बाहेर आरवी व जय ही भावंडे घराच्या बाहेरील अंगणात खेळत होती. आई वडिल घरात कामानिमित्त गुंतले होते. पिकअप मागे वळवत असताना चालकाने लक्ष न दिल्याने ही दोघे ही चिमुरडी गाडीच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. आई वडिलांसह गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला असुन गावात आक्रोश सुरु आहे.

Trending