आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिजोरीतल्‍या धनावर भुताची सावली आहे...लवकर हटवले नाही तर तुझे आईबाबा मरतील, हे ऐकून 9 वीच्‍या विद्यार्थ्‍याने आणून दिले तिजोरीतील सर्व पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- तुमच्‍या घरातील तिजोरीत भूतांची सावली आहे असे म्‍हणत दोन ठगांनी एका अन्‍नधान्‍य व्‍यवसायिकाच्‍या 14 वर्षीय मुलाकडून तब्‍बल दिड लाख रुपये उकळल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. व्‍यवसायिकाने ते पैसे राजस्‍थानमध्‍ये घर निर्माण करण्‍यासाठी ठेवले होते. तर त्‍यांचा 14 वर्षीय मुलगा हा नववीच्‍या वर्गात आहे. 12 सप्‍टेंररोजी तो ट्यूशनला चालला होता. त्‍यादरम्‍यानच खजूरी बाजारात त्‍याला एक ठग मिळाला. त्‍याने प्रथम त्‍याला पत्‍ता विचारला, नंतर त्‍याच्‍यासोबत चालू लागला. 


आरोपींनी सांगितले, तिजोरीतून पैसे नाही हटवले तर आईवडिलांचा मृत्‍यू होईल 
त्‍याच्‍यासोबत चालत असताना आरोपीने त्‍याला एक ताबिज दाखवले व म्‍हटले की, 'तुझ्या घरात जी तिजोरी आहे. तिच्‍यात भुताची सावली आहे. त्‍या धनाला हटवले नाही तर तुझ्या आईवडीलांचा मृत्‍यू होईल.' ते ऐकून मुलगा घाबरला. त्‍याने सरळ घरी जाऊन कशीबशी तिजोरीची चावी मिळवली. व त्‍यातील संपूर्ण दिड लाख रूपये काढून त्‍या ठगाला नेऊन दिली. 


मुलाचे कृत्‍य ऐकून वडिलांनी लावला कपाळाला हात 
ही घटना घडली तेव्‍हा मुलाचे वडिल राजस्‍थानात गेले होते. संध्‍याकाळी मुलाने घरी जेव्‍हा ही गोष्‍ट सांगितली तेव्‍हा घरच्‍यांना धक्‍काच बसला. नंतर मुलाचे 75 वर्षीय आजोबा त्‍याला घेऊन घटनास्‍थळी गेले. मात्र तेथे ठगवणा-या व्‍यक्‍ती आढळून आला नाही. नंतर त्‍यांनी याबाबत सराफा पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. मुलाचे वडिल 21 सप्‍टेंबररोजी ते राजस्‍थानाहून परतले. आपल्‍या मुलाने काय केले हे ऐकूण त्‍यांनी कपाळालाच हात लावला.  

बातम्या आणखी आहेत...