आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावरून काढल्याचा राग; कंपनीला दाेन काेटींचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अमेरिकेतील एका कंपनीत असलेला पुण्यातील एक अार्क्टिकेट महिनाभर सुटीवर देशात आला. मात्र, पुन्हा तो कामावर रुजू न झाल्याने कंपनीने त्यांना कामावरून काढल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या ग्राहकांना परस्पर संपर्क करून एक काेटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला. 


याप्रकरणी अाराेपी कपिल जय भगवान जैन (रा. वडगावशेरी, पुणे) याच्याविराेधात येरवडा पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत भारतभूषण बुघ (रा. दिल्ली) यांनी पाेलिसांत अाराेपीविराेधात फिर्याद दिली. भारत बुघ हे अमेरिकेतील यश गुप्ता राेगान ब्रिटाॅन इन्क या कंपनीच्या अध्यक्षांचे कुलमुक्त्याधारक अाहेत, तर कपिल जैन हा साेल्युशन अार्किटेक्ट व प्रिन्सिपल कन्सल्टंट म्हणून कंपनीत नाेकरीसाठी होता. कपिल सुटीवर येताना कंपनीची गोपनीय माहिती असलेला लॅपटॉप घेऊन भारतात आला. मात्र, सुटी संपल्यानंतरही तो कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. त्यामुळे जैन याने कंपनीच्या ग्राहकांना परस्पर संपर्क करून १ कोटी ८० लाख रुपये त्याच्या खात्यात भरण्यास सांगून कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...