Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Two daughters murder by women in immoral relationship; court sentenced to life imprisonment

अनैतिक संबंधांत अडसर, पोटच्या दोन्ही मुलींचा खून; आरोपी महिलेला जन्मठेप

दिव्य मराठी | Update - Aug 31, 2018, 10:55 AM IST

अनैतिक संबंधांत अडसर ठरू लागल्याने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींचा खून करणाऱ्या तेरा मैल येथील महिलेला न्यायालयाने गुरुवार

  • Two daughters murder by women in immoral relationship; court sentenced to life imprisonment

    सोलापूर- अनैतिक संबंधांत अडसर ठरू लागल्याने पोटच्या दोन अल्पवयीन मुलींचा खून करणाऱ्या तेरा मैल येथील महिलेला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. २२ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान हा प्रकार घडला होता.


    अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे भारती पप्पू राठोड (वय २८, बसवनगर, ता. दक्षिण सोलापूर) हिने काजोल (वय ७) व सोनाली (वय ५) पोटच्या दोन्ही मुलींच्या पोटात वार करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अजित त्रिपुटे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार दीपा राठोड (वय ११) आणि वैशाली राठोड (वय १५) या दोघींची साक्ष महत्त्वाची ठरली.

    सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरण्यात आल्या.सरकार पक्षाच्या वतीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर करण्यात आले. भारती राठोड हिला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र आरोपी महिला असल्याने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. २० वर्षे शिक्षा भोगेपर्यंत आरोपीचा जन्मठेपेची शिक्षा कमी करू नये, असे आदेश सरकारला देण्यात आले.

Trending