Mumbai rain / मुंबईतील मलाडच्या सबवेमध्ये पावसामुळे साचले पाणी, गाडी अडकल्यामुळे गाडीतच गुदमरून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

दोघांचे मृतदेह सहा तासांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले

दिव्य मराठी

Jul 02,2019 12:11:00 PM IST

मुंबई- मागील पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील मालाडमध्ये दोन भीषण दुर्घटना घडल्या आहेत. एका दुर्घटनेत 20 फूट उंच भिंत पडून 18 जणांचा मृत्यू झाला असून तर दुसऱ्या दुर्घटनेत 2 जणांच मृत्यू झाला आहे. त्यासोबतच कल्याणमध्येही शाळेची भिंत घरावर कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या ठिसाळ कारभारामुळे परिसरातील अनेक भागांत पाणी तुंबल्याने मुंबईकर अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. आहे. इतक्या दिवस महाराष्ट्र पावसाची वाट पाहत होता पण हाच पाऊस आता मुंबईकरांच्या जीवावर बेतत आहे.


मलाडच्या सबवेमध्ये पाणी साचल्यामुळे गाडी अडकली. यावेळी गाडीत गुदमरुन दोघांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांचे मृतदेह सहा तासांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. इरफान खान(38) आणि गुलशाद शेख(35) अशी या मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने पहाटे 4 च्या सुमारास स्कॉर्पिओ बाहेर काढली. यानंतर या दोघांचे मृतदेह यामधून काढण्यात आले.

X