आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे ट्रॅकवर उभे राहून दोघे खेळत होते मोबाइलवर Pubg Game, फास्ट ट्रेनने चिरडले.. हिंगोलीतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रेल्वे ट्रॅकवर उभे राहून मोबाइलवर पबजी खेळ (Pubg Game) खेळणार्‍या दोघांना हिंगोलीतीत सुपरफास्ट हैदराबाद-अजमेर फास्ट एक्स्प्रेसने चिरडली. ही धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.16) घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

 

नागेश गोरे (24), स्वप्निल अन्नापूर्णे (22) अशी मृतांची नावे आहेत. दोघे मोबाइलवर पबजी खेळण्यात एवढे दंग होते की, ट्रॅकवर फास्ट ट्रेन केव्हा आली हे त्यांना समजलेच नाही. 

 

काय आहे पबजी?
पबजी हा एक ऑनलाइन गेम आहे. हिंसक प्रवृत्तीच हा गेम असून अबालवृद्धांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. 

 

मोमो आणि ब्लू-व्हेल सारख्या गेमवर बंदी..
मोमो चॅलेंज आणि ब्लू-व्हेल सारख्या जीवघेण्या मोबाइल गेमवर भारतात बंदी आहे. काही दिवसांपूर्वी वांद्र्ये येथील एका 11 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेम पबजीवर प्रतिबंध घालावा, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते.

बातम्या आणखी आहेत...