आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात 24 तासांत दोन शेतकरी आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी/ धारूर : बीड जिल्ह्यात सुरू असलेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पूर्वी दुष्काळाने आणि आता अतिवृष्टीने पीक हातचे गेल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मागील २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवले. धारूर तालुक्यातील भोगलवाडी तर वडवणी तालुक्यातील देवळा येथे शेतकरी आत्महत्येच्या या घटना घडल्या.


भोगलवाडी येथे प्रभाकर साहेबराव मुंडे (४५) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मुंडे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्यावर जिल्हा बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते. अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले होते.


खडकी देवळा येथे मंगळवारी रात्री रामा बाबूराव शिंदे (३७) यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी पैसा जमवायचा कसा, या चिंतेतून शिंदे यांनी आत्महत्या केली. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

खांडेगाव येथे तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवले

हिंगोली : वसमत तालुक्यातील खांडेगाव येथे पांडूरंग नेवणाजी बेले (२४) या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. चार एकर शेती तो कसत होता. त्याने सोयाबिन व हळदीचे पीक घेतले होते. मात्र ते पावसामुळे गेले. पांडूरंग याचा मृतदेह हळदीच्या पिकात आढळून आला. फवारणीचे औषधही जागेवर नव्हते.
 

बातम्या आणखी आहेत...