आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी, दुष्काळ, कर्जाची चिंता; दोन शेतकऱ्याच्या आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - तालुक्यातील सारोळा येथील शेतकऱ्याने नापिकिला व कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दुष्काळी परिस्थिती व कर्जामुळे सारोळा येथील शेतकरी हरिभाऊ भिवसन वराडे (५०) यांनी बुधवार, २६ रोजी गळफास घेतला. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे अडुसष्ट हजार व खासगी सावकाराचे अंदाजे दीड-दोन लाख रुपये कर्ज असल्याचे सांगितले जाते. हरिभाऊ वराडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची अजिंठा पोलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


दुष्काळ, कर्जाची चिंता; शेतकऱ्याची आत्महत्या 
लोहारा : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व दुष्काळी परिस्थितीला कंटाळून ६५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहारा तालुक्यात सालेगाव येथे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सालेगाव येथील शेतकरी नारायण देवराव साळुंके यांना १ एकर शेतजमीन आहे. त्यांनी पेरणीसाठी ५० हजार रुपये हातउसने घेतले होते. व सहकारी सोसायटीचे १० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली. त्यामुळे ५० हजार रुपये व सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी स्वतः च्या राहत्या घरातील भिंतीच्या खुंटीला दोरीने गळफास घेतला.

बातम्या आणखी आहेत...