आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी फास : नापिकीमुळे बीड जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बीड - दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. शिवणी (ता. बीड) येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेतला तर चिंचवण (ता. वडवणी)  येथे विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला.


शिवणीतील शेतकरी हनुमान रघुनाथ सुर्वे (३०) यांच्याकडे  ३ एकर जमीन असून त्यांच्याकडे  राष्ट्रीयकृत बँकेसह खासगी लोकांचे देणे होते. यंदा कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट निर्माण होताच दोन्ही हंगाम वाया गेले. दोन दिवसांपूर्वी ते पिंपळ टक्का (ता. वडवणी) येथे गेले होते. मंगळवारी सकाळी गावी परतत असताना घाटसावळी शिवारात झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वॉटरकप स्पर्धेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामावर श्रमदानासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा मृतदेह आढळला.  याप्रकरणी  रघुनाथ दगडू सुर्वेंंच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची 
नोंद केली.


चिंचवणच्या शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या 
चिंचवण येथील  मोहन भिवाजी तांबडे (५५) या शेतकऱ्याने दुुष्काळी स्थितीमुळे विविध समस्या उभ्या राहिल्या.  त्यामुळे नैराश्येतून १४ मे २०१९  रोजी घरी सायंकाळी ५ वाजता कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना चिंचवण आरोग्य केंद्रात दाखल  केले. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.