आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला चार दिवसांत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - नापिकी, खासगी कर्ज आणि रब्बी हंगाम गेल्यामुळे ते फेडण्याचा तणाव यामुळे लातूर जिल्ह्यात चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हासेगाववाडी येथील चंद्रकांत साठे आणि मळवटी येथील तुकाराम घोडके अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.  औसा तालुक्यातील हासेगाववाडी  येथील चंद्रकांत साठे (४४) यांची सारोळा (ता. औसा) शिवारात तीन एकर शेती आहे. या वर्षी त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. पण त्यावर  रोग पडल्याने उत्पन्न घटले. त्यांनी औसा येथील एसबीआय शाखेकडून दीड लाख आणि एका खासगी संस्थेकडून अडीच लाखांचे कर्ज घेतले होते. तसेच काही खासगी व्यक्तींकडूनही पैसे उसने घेतले होते. मात्र सोयाबीनचे घटलेले उत्पन्न, तसेच रब्बी हंगाम गेल्यामुळे कर्ज फेडण्याचा तणाव यामुळे  रविवारी सकाळी त्यांनी  आत्महत्या केली.  

 
दुसऱ्या घटनेत लातूर तालुक्यातील मळवटी येथील  तुकाराम  घोडके (४५) यांनी चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली.  घोडके यांना केवळ एक एकर शेतजमीन आहे. यावरच  ते उदरनिर्वाह करीत होते. घोडके यांच्यावर खासगी सावकाराचे १ लाखाचे कर्ज होते. 

बातम्या आणखी आहेत...