आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टकलेपणावरचे दोन चित्रपट आणि त्यावरचे प्रसंग...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टकलेपणावर आधारीत दोन विनोदी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. परंतू टकलेपणा ही समस्या राहीलेली नाही, कृत्रिम प्रत्यारोपणाने ती दूर करता येते. या शस्त्रक्रियेच्या त्रासातून वाचायचे असेल तर केसांचा टोपही घालतो येतो. हिंदी सिनेमातील एक अभिनेता मागील २० वर्षांपासून हा विग घालतो, जो लंडनमध्ये बनविण्यात आलेला असून तो हुबेहुब खऱ्या केसांसारखा दिसतो. काही महिला कलावंतही विग घालतात. वयाचा खूप अनुभव असल्याचे भासण्यासाठी एकेकाळी न्यायाधीश पांढऱ्या केसांचा विग घालून न्यायालयात बसायचे.  राकेश रोशनने तर चित्रपटात काम करतानाच विग घालणे सुरू केले होते. एके दिवशी त्यांनी ते घालणे टाळत खुलेआमपणे कार्यक्रमांना जाणे सुरू केले. या काळातच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात उडी घेतली. एस. ए. राजामौलींच्या ‘बाहुुबली’च्या यशानंतर मानवीय करुणेवरील चित्रपट बंद करून राकेश रोशनने विज्ञानवादी चित्रपट बनवू लागले. ‘क्रीश’चा पुढील भाग त्यांच्या मुलाचे मित्र संजय गुप्तासोबत दिग्दर्शित करतील आणि यावर नियंत्रण राकेश रोशनचेच असेल. ते सध्या घशाच्या कर्करोगावरील उपचार घेत असून त्यांना यातून फरक जाणवत आहे. ऋषीकपूरही कर्करोगमुक्त होऊन नुकतेच भारतात परतले असून त्यांनी शूटिंगही सुरू केली आहे.  राजकपूरच्या ‘बूट पॉलिश’ चित्रपटात डेविड अब्राहम यांनी अभिनीत पात्र टकले असून तो केस येण्यासाठी नवनविन औषधे बनवतो. तुरूंगातील त्या खोलीतील सर्व कैदी टकले आहेत. तेथे डेविडला केस उगवण्याच्या कृतीबद्दल विचारले जाते व त्या प्रसंगावेळचे शंकर जयकिशन यांचे मन्ना डे यांनी गायलेले गाणे आहे- ‘लपक झपक तू आ रे बदरवा, तेरे घरे में पानी नहीं है, तू पनघट से भर ला’ खूप गाजले. गाणे सुरू झाल्याझाल्या पावसाला सुरूवात होते व डेविडला ज्यांना या पावसापासून बचावासाठी छप्पर नाही, अशा बेघरांची आठवण येते. एका श्रीमंंताने आपल्या घराच्या छतावर कृत्रिम पावसाचे यंत्र बसवले आहे, ज्याच्याव्दारे हवा तेव्हा पाऊस पाडत गरमागरम भज्यांचा आस्वाद घेता येताे. यामुळे निदा फाजलींनी लिहीलेल्या ‘बरसात का आवारा बादल क्या जाने, किस छत को भिगोना है, किस छत को बचाना है, हे गाणाे खाेटे ठरल्यासारखे वाटते.   गरिबीशी झुंजणाऱ्या दोन भारतीय अर्थशास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. अमर्त्य सेन यांचा प्रबंध सांगतो की, दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. नुकताच बनर्जी यांनाहही नोबेल पारितोषित मिळालेले आहे. त्यांच्यामते गरीबी हा एक जाणतेपणाचे षड्यंत्र आहे, ते मानवनिर्मित उत्पादन आहे. परंतू बनर्जींचे हे वक्तव्य सरकारच्या चुकीच्या निर्णयाची गोष्ट असल्याने हिणवलेे जात आहे, हे खेदजनक आहे. इथे नपुंसकतेवरही चित्रपट बनवला जात आहे. विज्ञानाच्या शोधावरही काही चित्रपट बनत आहेत. शुक्राणूंवरच्या संशोधनानंतरच ‘विकी डोनर’ शक्य झाला. शस्त्रक्रियेव्दारे फेस लिफ्ट म्हणजे सुरकुतलेला चेहरा पूर्ववत करणे शक्य आहे, परंतू वय आणि अनुभवाची ओळख या सुरकुत्या असतात. प्रत्येक प्रकारचे वाचणे-लिहीणे विसरत आहोत. कधीतरी कुत्सितपणे बोललेले शब्द खरे ठरत आहेत. काही खेळाडू वर्षाला कोटींनी कमावत असून प्रतिभावान लेखक मागे पडत आहेत. कर्करोगात केस जातात. एका जाहीरातीत एकजण म्हणतो की, कर्करोगामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण तो आधीच टकलू आहे. एक म्हण आहे, देव टकलूंना नखे देत नाही, कारण तो त्याने आपल्या डोक्यावर जखम करेल. परंतू सध्याला टकलेपणा ही समस्याही नाही आणि नखेही कापता येतात.