आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड तालुक्यात दोन वनरक्षक पुरात गेले वाहून, एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात भारंबा नजीक असलेल्या कोळबी नदीवरून वाहणाऱ्या पुरात दोन वनविभागाचे कर्मचारी वाहून गेले. त्यात एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. 

 

भारबा जैतखेडा भागात कार्यरत असलेले वन कर्मचारी हे रात्री पावसात पिशोरकडे जात होते. दरम्यान कोळंबी नदीवरील पुल पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे दोघेही दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन दोघे सापडले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान भारबा-पिशोर रोडपासून एक किलोमीटर अंतरावर राहुल दामोदर जाधव (वय 30) रा.सिंदखेडराजा यांचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहे.

बातम्या आणखी आहेत...