आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळजबरीने दारू पाजून मैत्रिणीवर दोन मित्रांनी केला बलात्कार, पुण्यातील पिसोळी परिसरात घडला धक्कादायक प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 22 वर्षीय तरुणीला बळजबरीने दारु पाजून बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. खोटे कारण सांगून तरुणीला पिसोळी परिसरातील डोंगरावर नेण्यात आले. तिच्या मित्रांनीच तिला दारु पाजली आणि शनिवारी सांयकाळी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. 


पीडित तरुणी माळवाडी परिसरातील आहे. 2018 मध्ये तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती लहान मुलाला घेऊन आईसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी तिची रिक्षाचालक कृष्णा जाधव याच्यासोबत ओळख झाली. दुसरा आरोपी अक्षय हा कृष्णाचा मित्र असल्यामुळे त्याच्यासोबतही मैत्री झाली. शनिवारी 25 मे रोजी तरूणी घरी असताना तिला अक्षयचा फोन आला आणि कृष्णा जाधव आजारी असल्याचे सांगून भेटण्यासाठी बोलावले.


त्यानंतर अक्षय गाडी घेऊन आला आणि तरूणीला घेऊन गेला. या दोघांना गोंधळेनगर येथे आरोपी कृष्णा भेटला. त्यांनी एका दुकानातून दारू विकत घेतली आणि हे सर्व पिसोळी येथील डोंगरावर गेले. त्या ठिकाणी दोघा आरोपींनी दारू प्यायली आणि तरूणीलाही बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर कृष्णा जाधव याने तिच्यावर बलात्कार केला. अक्षय चव्हाण यानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. तेव्हा अक्षय याने तिला चपलेने मारहाण करत बलात्कार केला.


त्यानंतर तरूणीने आरडाओरडा केला तेव्हा जवळून जाणाऱ्या दोन महिला धावून आल्या. यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. त्या महिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली.