आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे पार्टीनंतर लॉंग ड्राइव्हसाठी निघाले होते 3 मित्र, दोघांचा झाला मृत्यू, तिसरा आयुष्याशी लढत आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना : पावसामुळे खराब वातावरण, लेटनाइट बर्थडे पार्टी आणि भरदाव स्पीड शहरातील तीन कर्तबगार तरुणांच्या जीवावर बेतली. नॅशनल हायवेवर कारबारा चौकाजवळ रविवारी पहाटे 3:30 वाजता झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाला तर तिसरा सीएमसीमध्ये गंभीर अवस्थेत आहे. हे तिन्ही मित्र पार्टीनंतर लॉंग ड्राइव्हसाठी निघाले होते. पाऊस पडत होता, वातावरण बिघडले होते त्यामुळे टोल नाक्यापूर्वी युटर्न घेऊन परत निघाले होते परंतु तेवढ्यात एक कार भरदाव जवळून गेल्यामुळे गाडीच्या समोरील काचेवर पाणी उडाले आणि समोरचे काही न दिसल्यामुळे ड्रायव्हर तरुणाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरच्या खांबाला धडकली आणि पलट्या घेत दुसऱ्या बाजूला गेली. धडक एवढी भीषण होती की जमिनीत दीड-दोन फूट असलेल्या सिमेंटचा खांबही उखडला गेला. कर चक्काचूर झाली. कारच्या बॉडीपासून इंजिन वेगळे झाले. कारण कारची स्पीड गरजेपेक्षा जास्त होती. 


कार चालवत असलेल्या अश्विन वीज (22)चा जागेवरच मृत्यू झाला, शेजारी बसलेल्या एकलव्य शर्मा (22)ने हॉस्पिटलमध्ये जाताना दम तोडला तर तिसरा मित्र शुभम (22) सीएमसी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. लोकांनी सांगितले की, तिन्ही तरुण कारमध्ये विचित्र पद्धतीने अडकले होते. पोलिसांनी क्रेन बोलावून त्यांना बाहेर काढले. जमालपुर येथे मुंडियां कलां भागात राहणारे तिन्ही तरुण आपापल्या कुटुंबातील एकुलतेएक होते. चंदिगढ रोडवरील एका हॉटेलमध्ये एकलव्यची बर्थडे पार्टी झाल्यानंतर फगवाडाकडे लॉंग ड्राइव्हसाठी निघाले होते परंतु खराब वातावरणामुळे त्यांचा विचार बदलला आणि लाडोवाल टोल नाक्यापूर्वी कार शहराकडे वळवली. एसएसआय गुरमीत सिंह यांनी सांगितले की, या तिघांची  8-10 वर्षांपासूनची मैत्री होती आणि रेयान इंटरनॅशल स्कुलचे विद्यार्थी होते. संध्याकाळी उशिरा एकलव्य आणि अश्विन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्टडी व्हिजावर विदेशात जाण्यास इच्छुक होते एकलव्य आणि शुभम
एकलव्यचे वडील भूपिंदर शर्मा यांचे चंदीगड रोडवर शर्मा शु स्टोअर आहे आणि ते वास्तू शास्त्राचेही काम करत होते. एकलव्य स्टडी व्हिजावर कॅनडामध्ये जाण्याची तयारी करत होता. अश्विनीचे वडील राजकुमार मनिलामध्ये आणि आई जगराओ येथे राहत होते. अश्विनी अनेक वर्षांपासून आत्याच्या मुलाकडे राहत होता. यांचे फोर्टिस हॉस्पिटलसमोर वीज गेस्टहाऊस आहे. त्याने चार महिन्यांपूर्वीच शृंगार सिनेमा रोडवर दास किचन अँड हार्डवेअर नावाने दुकान उघडले होते आणि नवीन कार खरेदी केली होती. याच कारने तिन्ही मित्र निघाले होते. जखमी शुभम भट्टचे वडील देवी भट्ट हिरो ग्रुपमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. मित्र एकलव्यप्रमाणे त्यालाही विदेशात पुढील शिक्षणासाठी जायचे होते.

बातम्या आणखी आहेत...