पुण्यात एका खोलीत / पुण्यात एका खोलीत मृतावस्थेत सापडले दोन मित्र, पेस्ट कंट्रोलमुळे मृत्यू झाल्याचा संशय

दिव्य मराठी वेब टीम

Mar 07,2019 06:36:00 PM IST

पुणे- कात्रज पी.आय.कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करणार्‍या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता दोन्ही मुले कॅन्टीन परिसरातील एका खोलीत मृतावस्थेत आढळून आले. पेस्ट कंट्रोलमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अजय राजू बेलदार (20) आणि अनंत खेडकर (20) अशी मृत मुलांचे नावे असून दोघे चांगले मित्र होते. दोघे पी.आय कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मागील एकवर्षापासून काम करत होते. अजय जलगावचा तर अनंत हा बुलढाणा येथील रहिवासी होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.

अजय आणि अनंतने बुधवारी रात्री उशीरा कॅन्टीनमध्ये जेवण केल्यानंतर आपल्या खोलीत झोपायला गेले. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दोघे मृतावस्थेत अाढळून आले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही मुले एकाच खोलीत राहत होते. खोलीत मोठ्या प्रमाणात ढेकूण होत. मंगळवारी खोलीत ढेकूण मारण्याचे औषधी फवारण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही मुले मित्राच्या खोलीत जाऊन झोपले होते. गुरुवारी सकाळी दोघे मृतावस्थेत आढळून आले.

मॅनेजरला दिसले मृतदेह..

गुरुवारी सकाळी अजय आणि अनंत कॅन्टीनमध्ये न आल्याने मॅनेजर त्यांच्या खोलीकडे गेला असता खोलीत दोघांचे मृतदेह त्याला दिसले. मॅनेजरने पोलिसांना याघटनेची माहिती दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दोघांना भारती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप

दरम्यान, अजय आणि अनंतच्या नातेवाईकांनी कॅन्टीन प्रशासनावर हत्येचा आरोप केला आहे. कॅन्टीमचा मॅनेजर पोलिसांची नातेवाईकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. अनंतच्या हातातून रक्त निघत असल्याने त्याला मारहाण करण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांग‍ितले आहे.

X
COMMENT