आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या चित्रपटाप्रमाणे 40 वर्षांनंतर झाली दोन मित्रांची भेट, एक बँक मॅनेजर तर दुसरा ऑटो ड्रायव्हर ; गळाभेट घेताच दोघांनाही झाला अश्रू अनावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


चित्तौडगढ़ (राजस्थान) : शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत शनिवारी वेगळाच प्रसंग अनुभवयास मिळाला. कारण बँक व्यवस्थापक एका ऑटो ड्रायव्हरची गळाभेट घेत होता. लहानपणीचे दोन मित्रांच्या भेटीचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्यासाठी हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हते.  लहानपणी वेगळ्या झालेल्या मित्रांची ही भेट होती. यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. लहानपणी सोबत खेळणारे हे मुलं आता काम-धंद्याला लागले होते. पण त्यांच्या हृदयात मैत्री होती. चाळीस वर्षापूर्वीच्या आठवणी होत्या. 


काहीशी अशी आहे दोघांच्या लहानपणीच्या मैत्रीची गोष्ट
चाळीस वर्षापूर्वी अनुजचे वडील कन्हैयालाल चित्तौडगड येथील सैनिकी शाळेत प्राध्यापक होते. तेथे पीर मोहम्मदचे वडील फतेह मोहम्मद इलेक्ट्रिशयनचे काम करत होते. दोन्ही परिवार जवळच राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये घरच्यासारखे संबंध होते. एकमेकांच्या घरी ये-जा करणे, सुख-दुःखाच्या प्रसंगी साथ देणे सुरू असायचे. कन्हैयालाल यांचा परिवार ईदच्या दिवशी फतेह मोहम्मद यांच्याकडे शेवयाचा आनंद घेत असत तर फतेह मोहम्मद यांची दिवाळी कन्हैयालाल यांच्याकडे साजरी होत होती. अनुज आणि पीर मोहम्मद आपला जास्त वेळ एकत्रित घालवत होते. एकेदिवशी फतेह मोहम्मद यांना नोकरीवर असतांना हृदयविकाराचा झटका आला होता. काहीवेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नीची नोकरी लागली. काही काळानंतर कन्हैयालाल यांची बदली झाली. आपल्या परिवारासोबत ते उदयपूर येथे स्थायिक झाले होते. त्याकाळी संपर्काचे साधन नसल्यामुळे कालांतराने त्यांच्यातील ये-जा करणे बंद झाले. वेळेसोबत दोन्ही परिवारातील संपर्क तुटला. कन्हैयालाल यांचा मुलगा अनुज चित्तौडगड येथे बँक ऑफ बडोदा येथे शाखा व्यवस्थापक आहे. तर फतेह मोहम्मद यांचा मुलगा पीर मोहम्मद येथे ऑटो चालवतो. शनिवारी पीर मोहम्मदला बँकेत बघतात अनुजने त्याला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. त्यानंतर अनुजने आपल्या आईचे पीर मोहम्मदसोबत फोनवर बोलणे करून दिले. 

 

चित्तौडगड येथे बदली झाल्यापासून घेत होता पीर मोहम्मदचा शोध, ग्राहक अकरमने घडवून आणली भेट

अनुज पोरवाल यांची काही दिवसांपूर्वीच येथील बँकेत बदली झाली होती. येथे आल्यानंतर त्यांनी बँकेतील एक ग्राहक अकरम अली याच्याकडे पीर मोहम्मद बद्दल चौकशी केली. अकरम त्यांना शोधण्याचे वचन दिले. फतेह मोहम्मद यांचे 40 वर्षापूर्वी निधन झाल्यामुळे अनेक दिवसांनंतर त्यांच्या परिवाराला शोधू शकले नाही. दरम्यान एकेदिवशी अकरम यांची सैनिकी शाळेतील निवृत्त कर्मचारी देवीलाल यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडे दिवंगत फतेह मोहम्मदचा विषय काढताच त्यांचा परिवार शहरातील कस्बा चौकीजवळ राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अकरम तेथे गेले आणि फतेह मोहम्मद यांचा मुलगा पीर मोहम्मदला अनुज पोरवाल विषयी सांगितले. त्यानंतर अकरमने पीर मोहम्मद यांना बँकेत आणले. 

बातम्या आणखी आहेत...