आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायब्रेशनमुळे आकाशपाळणा हलायला लागला, 48 फूटावरून पडलेल्या दोन तरुणी ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाशपाळण्यावरून मुली अशा खाली पडल्या. - Divya Marathi
आकाशपाळण्यावरून मुली अशा खाली पडल्या.

अम्बाला - तीज उत्सवाच्या जत्रेत पाळण्यावरून पडून दोन तरुणींनी प्राण गमावला. त्यानंतकर पाळण्याचा संचालक घटनास्थळाहून फरार झाला आहे. हा अपघात अंबाला कँट रंगिया मंडी येथील हाथीखाना मंदिराजवळ झाला. येथे तीज उत्सवाच्या निमित्ताने जत्रा भरली होती. रविवारी एका कुटुंबातील 6 तरुणी मामाबरोबर जत्रेत आल्या होत्या. त्या रहाटपाळण्यात बसल्या होत्या. पण पाळण्याचा वेग जास्त असल्याने त्याचे व्हायब्रेशन झाले आणि सर्वात बरच्या डब्यात असलेल्या या तरुणींचे सीट उलटले. त्यामुळे त्या 48 फूट उंचीवरून खाली रस्त्यावर पडल्या. अंजली (18) आणि दीपू (25) या दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


वेग जास्त असल्यामुळे.. 
प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितले की, पाळण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे पाळणा हलायला लागला. सर्वात वरच्या जब्यात दोन तरुणी बसलेल्या होत्या. पाळणा जोरात हलायला लागला त्यामुळे सीट उलटे झाले आणि या दोघी खाली पडल्या. काही लोक या अपघातानंतर काही लोक हसत होते. पण एका तरुणीने त्यांना रुग्णालयात पोहोचवले आणि पोलिसांना माहिती दिली. 

 

दोघे बचावले..
खास तीजच्या उत्सवासाठी मेरठचे किशोरी लाल बहिणीकडे अंबालाला आले होते. पाळण्यात त्यांचा मुलगा आत्याची मुलगी कविताबरोबर बसलेला होता. पण पाळणा हलू लागला तेव्हा त्यांनी एकमेकांना पकडून ठेवले आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. 

 

बातम्या आणखी आहेत...