आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बक्सर(बिहार)- नवीन भोजपूर ओपी क्षेत्रात एक तरूणी आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणीसोबत बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोवारी सकाळी 9 वाजता घटनेचा उलगडा झाला. ओपी प्रभारी ऋषी कुमारने प्रकरणाची माहिती डुमरांव एसडीपीओ के. के. सिंह आणि एसपी उपेन्द्र नाथ वर्मा यांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली. महिला पोलिसांनी मुलींना विचारपुस करून सगळा प्रकार जाणून घेतला आणि दोन आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले. बलात्काराची घटना होळीच्या दिवस घडली.
प्रियकाराला भेटायला गेली होती पुजा(काल्पनीक नाव)
21 मार्चला दुपारी पुजा आणि रीता(काल्पनिक नाव) या दोघी पुजाच्या प्रियकराला भेटायला गेल्या होत्या. संध्याकाळी घरी परतल्यावर त्या रडू लागल्या, घरच्यांनी विचारल्यावरदेखील त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर पुजाची तब्येत रविवारी अचानक खराब झाली. त्यानंतर आईने रागवून विचारल्यावर तिने घडलेला सगला प्रकार सांगितला.
रीताच्या घरचे ऐकायला तयार नव्हते
रीताचे नाव समोर येताच पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी बोलवून घेतले. चौकशीदरम्यान तिने अनेकवेळा खोट सांगितले. पण थोड्या वेळाने पोलिसांनी कसून चौकशी केल्यास तिने सगळा प्रकार सांगितला आणि कबुल केले की, तिच्यावरही बलात्कार झालाय. मेडकल तपासात समोर आले की, दोन्ही मुलींवर बलात्का झालाय. पोलिसांनी तगेच कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.