आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात सरपंचाला मागितली 40 हजारांची लाच, महिला अधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - येथील मंठा तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना मंगळवारी रंगेहात पकडण्यात आले आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. आरोपी अधिकाऱ्यांनी सरपंचाकडून 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याच रकमेपैकी 20 हजार रुपये घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना एका हॉटेलात अटक करण्यात आली. सरपंचांनी दिलेल्या तक्रारीवरून भ्रष्टाचारविरोधी पथकाने ही कारवाई केली.


मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आत्माराम आसाराम चव्हाण व कनिष्ठ अभियंता स्नेहल विनायक भोसले यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात झालेल्या घरकुल व स्वच्छतागृह बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. त्यासंदर्भात खोटा चौकशी अहवाल तयार करुन आपल्याला अडकवितो, अशी धमकी दिली. चौकशीच्या फेऱ्यात अडकायचे नसेल तर चाळीस हजार रुपये द्या अशी मागणी केली. चव्हाण व भोसले यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार 40 हजारांपैकी 20 हजार रुपये एका हॉटेलात आणून देण्याचे ठरले. हॉटेलमध्ये एसीबीने आधीचसापळा लावला होता. विस्तार अधिकारी चव्हाण व अभियंता स्नेहल भोसले यांना 20 हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची सविस्तर चौकशी केली जात आहे.