आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर येथे दोन गटांमध्ये झाली हाणामारी, शस्त्रांचा वापर; ३ गंभीर, एक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- येथील मुजावरपुरा भागात जुन्या वादातून एकाच समाजाच्या दोन गटात हाणामारी झाली. शस्त्रांचा वापर झाल्याने त्यात चौघे जखमी झाले. त्यातील तिघे गंभीर असून एकाला किरकोळ मार लागला. जखमींना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात भरती केले आहे. 


प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास मुजावरपुरा भागामध्ये बीसीच्या वादातून दोन गट समोरासमोर आले. त्यातून मारहाण करण्यात आली. यात सैयद असद सैयद गबरु, त्यांचा मुलगा सैयद वसीम सैयद असद गंभीर जखमी झाले. दुसऱ्या गटातील शहजादखान व सद्दामखान, त्यांचे वडील अहमदखान यांना गंभीर इजा झाली. 


या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. शहजादखान, सद्दामखान आणि अहमदखान या तिघांना पोलिसांनी १०८ क्रमांकाच्या गाडीद्वारे अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. तर, सैयद वसीम सैयद असद याला पोलिसांच्या जीपमध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...