आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक, ३५०० कोटींची संपत्ती जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळाप्रकरणी मंुंबई पोलिसांनी गुरुवारी हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या (एचडीआयएल) दोन संचालकांना अटक केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी एचडीआयएलचे संचालक राकेश वधावन आणि त्यांचा मुलगा सारंग वधावन यांना आर्थिक गुन्हा शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली आहे. एचडीआयएलची ३५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी बँकेचे माजी व्यवस्थापक आणि एचडीआयएलचे प्रवर्तकांविरोधात एफआयआर दाखल केला होता. वधावन पिता-पुत्रांनी देशातून पलायन करू नये यासाठी लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. एफआयआरमध्ये पीएमसी बँकेचे माजी व्यवस्थापक वायम सिंह आणि निलंबित मुख्य संचालक जॉय थॉमस यांचीही नावे आहेत. रिझर्व्ह बँकेने बँकेवर प्रशासक नेमला आहे. प्रशासक जसबीरसिंह मठा यांनी तक्रारीत म्हटले होते की, २००८ पासून ते ऑगस्ट २०१९ पर्यंत एका विशिष्ट कंपनीला देण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यात आली नव्हती तरीही हे कर्ज अनुत्पादकमध्ये (एनपीए) दाखवण्यात आले नव्हते.