आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात होळीच्या दिवशी 2 हिंदू तरुणींचे अपहरण; बळजबरी धर्म परिवर्तन आणि निकाह, हिंदू समुदाय रस्त्यांवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानात होळी साजरी होत असतानाच हिंदू समुदायातील दोन तरुणींचे अपहरण करण्यात आले. यानंतर बळजबरी दोघींचे लग्न करून त्यांचा धर्म बदलण्यात आला आहे. यातील एकीचे नाव रवीना असून ती फक्त 13 वर्षांची आहे. तर दुसरीचे नाव रीना असून ती 15 वर्षांची आहे. ही घटना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेवर पाकिस्तानातील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच ठिक-ठिकाणी सरकार आणि प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत.


पाकिस्तानातील हिंदू समुदाय रस्त्यावर...
पाकिस्तान हिंदू वेलफेअर ट्रस्टचे प्रमुख संजेश धंजा यांनी सांगितल्याप्रमाणे, यासंदर्भात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला. तरीही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आता पाकिस्तानातील हिंदू समुदाय आपल्या हक्कासाठी रस्त्यांवर उतरला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच प्रांतात आणखी दोन मुली कोमल आणि सोनिया या दोघींचे अपहरण करण्यात आले होते. त्यांचा सुद्धा मुस्लिम युवकांशी निकाह करून त्यांना बळजबरी मुसलिम बनवण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतेच एक वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यामध्ये "नया पाकिस्तानात जिन्ना यांच्या विचारानुसार सर्वच अल्पसंख्याकांना समान वागणूक दिली जात आहे. येथे भारतासारखे होत नाही." असे लिहिले होते. यावरून त्यांच्यावर खूप टीका करण्यात आली होती. सिंध प्रांतात घडलेल्या अपहरण आणि बळजबरी धर्मपरिवर्तनाच्या घटनेमुळे पाकिस्तान आणि इम्रान या दोघांचा खरा चेहरा समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...