आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत पोलिस अधिकाऱ्याने तपासले अत्याचाराचे दोनशे खटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकपट्टण महिला पोलिस ठाण्याची प्रभारी अधिकारी म्हणून दोन महिन्यांपूर्वी स्वीकारणारी तरुण उपनिरीक्षक कुलसुम फातिमा सध्या देशभरात त्यांच्या कामामुळे चर्चेत आहे. त्यांनी केवळ दोन महिन्यांत दुष्कृत्य आणि लैंगिक शोषणाच्या दोनशे प्रकरणांचा तपास केला. कुलसुम जिल्ह्यातील पहिली महिला पोलिस अधिकारी आहे.

दोन महिन्यांच्या कमी काळातच त्यांनी परिश्रम आणि उत्साहाने असामान्य प्रदर्शन केले. अल्पवयीन मुलींचे होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना ऐकून त्यांना संताप येतो, मात्र काही करू शकत नाहीत, असे काही दिवसांपूर्वीच त्या म्हणाल्या हाेत्या. कुलसुम म्हणाल्या होत्या की, ‘मला असे पद हवे होते जेथे राहून मुलींसाठी काही तरी करता येईल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला पंजाब पोलिसांत उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली, तेव्हा काही तरी करण्याची मला संधी मिळाली.’ कुलसुम यांची आदर्श  पोलिस ठाणे दलेरिया येथे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अल्पवयीन आणि महिलांसंदर्भातील प्रकरणे पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...