आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या 2 घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या. याप्रकरणी नांदेड ग्रामीण व तामसा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी अज्ञात असून अद्याप एकालाही अटक झालेली नाही.

   
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हस्सापूर पुलाचे जवळ हरमिंदरसिंग देविंदरसिंग भोसीवाले (२४) या तरुणाचा मंगळवारी (दि. १३) दुपारी धारदार शस्त्राने डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर, हातावर वार करून खून केला. खुनानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कौठा परिसरातील गोदावरी नदीचे पात्रात त्याचे प्रेत फेकून दिले. याप्रकरणी देविंदरसिंग भोसीवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.    


हदगाव तालुक्यातील पाथरड येथील शेषराव नागोराव पवार (५०) या शेतकऱ्याचा मंगळवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. रात्री ११ वाजता वीजपुरवठा सुरू होणार असल्याने ते शेतात गेले. वीजपुरवठा येण्याची वाट पाहत ते बोअरवेलजवळ झोपले असताना अज्ञात आरोपींनी झोपेतच त्यांचा डोक्यावर दगड घातला. खुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...