आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्यानेच घेतला दोन चिमुकल्यांचा बळी, या कारणामुळे प्राण जाईपर्यंत जमिनीवर आपटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उदयपूर/ओगणा : जिल्ह्यातील ओगणा येथे गुरुवारी हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे. येथे एका पित्याने नशेत दोन निष्पाम मुलांची जमिनीवर आपटून हत्या केली. पोलिसांना आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, खातू वडेराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेशने गुरुवारी सकाळी मोठ्या भावाच्या घरी झोपलेल्या 5 वर्षीय राजू आणि 3 वर्षीय कुशबाला आपल्या घरी घेऊन आला आणि दोन्ही मुलांना निर्दयीपणे जमिनीवर आपटण्यास सुरुवात केली.  

 

मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर रमेशचे वडील खातू वडेरा बाहेर आले असता दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. वडील बाहेर येण्याची चाहूल लागताच रमेशने घरातून पळ काढला. दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

 

तीन दिवसांपूर्वीच पोलीसांनी दिला होता समंस

पोलिसांच्या मते, आरोपी रमेश पन्नलाल जोशी यांच्याकडे ड्रायव्हरची नोकरी करत होता. नेहमीच नशेत राहत असल्यामुळे उमाशंकर यांनी त्याची नोकरीवरून हकालपट्टी केली. यामुळे रमेशने उमाशंकरला काठीने मारहाण केली होती. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच समंस देऊन सोडले होते.

 

यामुळे वाचला तिसऱ्या मुलाचा जीव

रमेश मागील अनेक दिवसांपासून पत्नी नानुडीवर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात अनेकवेळा वाद होत होता. आठ दिवसांपूर्वीच या त्रासाला कंटाळून नानुडी तिसऱ्या मुलीसोबत माहेरी निघून गेली होती. यामुळे तिसऱ्या मुलीचे प्राण वाचले. अन्यथा रमेशने तिचाही बळी घेतला असता. रमेश त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे नानुडीचे पिता कला राम यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...