आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन किडन्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेस लागला दीड तास; कोलकाता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये दुर्मिळ सर्जरी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- कोलकाताच्या रविंद्रनाथ टॅगोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डियाक सायन्सेस (आरटीआयआयसीएस) येथे किडनी प्रत्यारोपणाची दुर्मिळ केस हाती आली आहे. एका रुग्णास दोन किडन्या प्रत्यारोपित करण्यात आल्या. आरटीआयआयसीएसच्या डॉक्टरांनी सांगितले,ज्या महिलेच्या किडन्या दान करण्यात आल्या होत्या, तिचे वय ३ वर्षे होते. 

 

ज्या व्यक्तीला किडन्या दान दिल्या त्याचे वय ४१ होते. त्या दोन्ही किडन्या चांगल्या कार्यरत राहाव्यात म्हणून दोन्ही किडन्या बसविण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया दीड तास चालली. हे प्रत्यारोपण एन ब्लॉक रीनल प्रक्रियेतून करण्यात आले. ही प्रक्रिया खूप कमी वेळा वापरली जाते. प्रत्यारोपणानंतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. युरिनचे आऊटपुटही चांगले आहे. रुग्णास अॅनेस्थेशियाच्या हाय डोसवर ठेवण्यात आले आहे. 

 

ब्रेन हॅमरेजच्या २ दिवस आधी वाचले होते अवयवदानाबद्दल 
किडनी दान करणाऱ्या रीना मुखर्जीला हॅमरेजनंतर २८ जानेवारीस रुग्णालयात दाखल केले होते. तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. तिचे पती सौमेंद्रनाथ यांनी म्हटले, रीनाने ब्रेन हॅमरेजच्या दोन दिवस आधीच अवयवदानाबद्दल वाचले होते. तिने अवयवदान करण्याची इच्छा जाहीर केली होती. तिची इच्छा पूर्ण करू शकलो, याचे समाधान आहे. यामुळे अन्य कोणाचा तरी जीव बचावला, ते महत्वाचे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...