Maharashtra Crime / शेलबारी घाटात मोटारसायकलचा भीषण अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

वाहनचालक धडक देऊन पसार झाला

Sep 04,2019 10:25:00 PM IST

पिंपळनेर- शेलबारी घाटात पुन्हा दोघा निष्पपांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. सुरपान (ता.साक्री) येथील दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते.

सुरपान (ता.साक्री) येथील विजय दामोदर देवरे हा सुरपान येथील पोल्ट्री फार्म वर कामास असलेले बंसीलाल रणसिंग माळी यांच्यासोबत मोटारसायकल (क्र.एम.एच.18 टी.8834)वरुन सुरपान येथून दसवेलला येत असतांना पिंपळनेरजवळील शेलबारी घाटातील वळणावर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.


या भीषण अपघातात विजय दामोदर देवरे(वय41) व बंसीलाल रणसिंग माळी(वय41)या दोघांचा जागीच मृत्यू झाला. विजय दामोदर देवरे हा शेती करत होते व सुरपानमध्येच आपल्या परीवारासह राहत होते. तर बंसीलाल रणसिंग माळी हे पोल्ट्री फार्मवर कामाला होते. अपघाताची बातमी मिळताच मयताच्या नातेवाईकांनी पिंपळनेर
ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.

दरम्यान अज्ञात वाहनाने दोघांना ठोस मारुन अपघात करुन त्यांच्या मरणास व मोटर सायकलीच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याने गणेश दामोदर देवरे (रा.नामपूर ता.सटाणा जि.नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून
अज्ञात वाहन चालकाविरुध्द पिंपळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी पंजाबराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.

X