आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड येथे ट्रक व लोडिंग रिक्षात जोरदार धडक; दोघे ठार, ३ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- शहरानजीक धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा ढाब्याजवळ बुधवारी (दि. १०) पहाटे ट्रक व लोडिंग रिक्षाची जोरदार धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात ३ जण जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. 


लोडिंग रिक्षामधील शेख मोहंमद सादेक मोहंमद मुसा (४२, शरीफ कॉलनी, आैरंगाबाद) कॉलनी व इबादउल्ला खान असदउल्ला खान (२५, कैसर कॉलनी) अशी मृतांची नावे अाहेत. रिक्षामधील मिलिंद भालेराव (रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) व ट्रकमधील एस. राममूर्ती व के. व्यंकटनाथ या जखमींना औरंगाबादला पाठवले आहे. चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणारी लोडिंग रिक्षा (एमएच २० डीई ३८३२) व औरंगाबादकडून चाळीसगावकडे जाणारा ट्रक (एपी ०२ टीए १११६) यांची सदरील ठिकाणी पहाटेच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. 


कन्नड शहर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक किरण गंडे यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक असमान शिंदे, सतीश दिंडे, कैलास करवंदे, राजेंद्र मुळे, गजानन कऱ्हाळे, गणेश चेळेकर, विनोद पाटील, हुसेन पठाण यांनी घटनास्थळी जाऊन गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढले व जखमींना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवले.
 

बातम्या आणखी आहेत...