Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | two killed one attempted suicide in pubg addiction in maharashtra

हिंगोलीत रेल्वे रुळांवर PUBG खेळण्यात मग्न 2 मित्रांना रेल्वेने चिरडले; नाशकात एकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 10:39 AM IST

पबजी खेळण्यास मनाई, मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

  • two killed one attempted suicide in pubg addiction in maharashtra

    हिंगोली / नाशिक - खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळांवर बसून २ मित्र पबजी गेम मोबाइलवर खेळण्यात मग्न असताना रेल्वेखाली चिरडल्याची घटना येथे शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी सांगितले, नागेश गोरे (२२) व त्याचा मित्र स्वप्निल अन्नपूर्णे (१७) रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळत होते. या वेळी पूर्णा - अकोला लोहमार्गावरून हिंगोलीकडे मालगाडी येत असताना पबजी गेम खेळण्यामध्ये मग्न असलेल्या असलेले हे दोन्ही मित्र रेल्वेखाली सापडून जागीच ठार झाले. काही क्षणांमध्ये दोघांच्याही शरीराच्या चिंध्या चिंध्या होऊन शरीराचे तीन ते चार तुकडे झाले. याबाबत रेल्वेच्या पायलटने हिंगोली रेल्वेस्थानकात नियंत्रण कक्षात संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन रेल्वे पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुढील प्रक्रिया केली. मृत दोघेही मित्र खटकाळी भागातील हनुमाननगरचे रहिवासी आहेत.


    पबजी खेळण्यास मनाई, मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
    'पबजी' गेम खेळण्यास पालकांनी मनाई केल्याने अल्पवयीन मुलाने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सातपूरमध्ये घडली. तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने मुलाचे प्राण वाचले.

Trending