आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वाहनांची समोरासमोर धडक, बदनापूरजवळ ट्रेलरच्या अपघातात दोन जण ठार, एकजण गंभीर जखमी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बदनापूर : जालना-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून, रविवारी ४ वाजेच्या सुमारास या रस्त्यावरील गेवराई फाट्याजवळ कंटनेर वाहतूक करणारा मोठा ट्रेलर व जेसीबी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरवर समोरून आदळल्यामुळे झालेल्या अपघतात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला आहे. बदनापूरपासून चार किलोमीटर अंतरावर आज रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला.

संजीवनी ट्रान्स्पोर्टचा मोठा कंटनेर वाहतूक करणारा ट्रेलर (एमएच ४३, वाय ७१३०) औरंगाबादच्या दिशेने जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे भरधाव वेगाने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या जेसीबीची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरवर जोरात आदळला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहनांतील दोघे जण जागीच ठार झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये कंटनेरचा चालक विठ्ठल रंगनाथ बरबडे (२५, पाचेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व ट्रेलरचालक (नाव समजले नाही) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, बदनापूर येथे पाठवण्यात आले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी वरूडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात या महामार्गावर अपघाताची मालिकाच सुरू आहे. बुधवारी अमृतसर पेट्रोल पंपसमोर कार व रिक्षाच्या भीषण अपघातात छोट्या बाळासह सहा जण दगावल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.