आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी आणायला गेलेल्या दोघा ऊसतोड मजुरांचा विहिरीत पडून मृत्यू, माढा तालुक्यातील भेंड गावातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकजण तोल जाऊन पाण्यात पडला तर दुसरा त्याला वाचवताना बुडाला

संदीप शिंदे  

माढा - पाणी आणण्यासाठी  गेलेल्या ऊसतोड मजुराचा पाण्यानेच बळी घेतल्याची दुर्देवी घटना माढा तालुक्यातील भेंड गावात बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. दोघाचे प्रेत तीन तासांनी  बाहेर काढण्यात कुर्डूवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांना ग्रामस्थांच्या मदतीने यश आलंय.

राजू रावसाहेब माळी ( वय 42, रा. चंदनापरी, तालेवाडी, ता.अंबड जि जालना),भगवान उत्तम चौधरी ( वय 40, रा़ मादळमोही ता. गेवराई, जि़ बीड) अशी विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू  पावलेल्या दोघा ऊस तोड मजुराची नावे आहेत. भेंड गावच्या शिवारत असलेल्या शैलेश भारत दोशी यांच्या ग.क्र 191 मध्ये असलेल्या विहिरीतील पाणी आणण्याकरिता भगवान
चौधरी आले होते. विहिरीतुन खाली  उतरत  असताना त्यांचा तोल गेला अन् ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने ते पाण्यात आरडा ओरडा करु लागले.


भगवान यांना  वाचवण्यासाठी त्यांच्या सोबत आलेले राजु माळी  उतरत असताना 
त्यांचाही पाय घसरल्याने तेही पाण्यात पडले अन् दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने दोघांचे  प्रेत अडीच वाजता दाखल  झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश सुरु केला.


अथक प्रयत्नानंतर मृतदेह विहीरीबाह
ेर


विहीरीत दोघांचा  मृत्यू झाल्याची  माहिती ग्रामस्था मार्फत मिळताच स.पो.नि.  चिमणाजी केंद्रे यांनी पोलिसांसमवेत घटनास्थळी तात्काळ पोहचले. पोलिस मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या मदतीसाठी ग्रामस्थ सरसावले. दोरीच्या सहाय्याने पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर सव्वा बारावाजता  भगवान चौधरी यांचा तर राजु माळी यांचा दिड वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले

बातम्या आणखी आहेत...