Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Two Lovers Dead body Found at Aundha Nagnath

औंढा नागनाथ येथील जंगलात प्रेमीयुगुलाची आत्महत्या; पाच दिवसांपासून धुरपता होती बेपत्ता

प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 07:13 PM IST

दोन प्रेमीयुगल मागील शनिवारपासून त्याठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Two Lovers Dead body Found at Aundha Nagnath

    हिंगोली- औंढा नागनाथ येथून जवळच असलेल्या गोकर्ण माळावर घनदाट जंगलामध्ये प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दोघांनी चार-पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली असण्याची शक्यता असून दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जंगलात गेलेल्या काही शेतकऱ्यांना आढळले. अंदाजे 17 ते 20 वयोगटातील या मयत युगलांची धुरपता कुंडलिक लिंबाळकर आणि गजानन विठ्ठल कुरुडे अशी नावे आहेत.

    धुरपता लिंबाळकर ही औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी असून गजानन कुरूडे हा औंढा नागनाथ तालुक्यामधीलच गोळेवाडी या गावचा रहिवाशी आहे. दोघेही औंढा येथे नागनाथ महाविद्यालयात शिक्षण घेत होते. पाच दिवसापूर्वी धुरपता लिंबाळकर ही घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा शोध घेऊन सुद्धा ती न सापडल्यामुळे तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी केली होती. परंतु आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. औंढा नागनाथ येथून सुमारे चार ते पाच किलोमीटर असणाऱ्या गोकर्ण माळावरील घनदाट जंगलामध्ये आज सकाळी एक शेतकरी गेला असता त्याला ही घटना दिसून आली. दोघांनीही ओढणीचा दोरखंड तयार करून त्याचा पास तयार केला आणि आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह जमिनीपासून सुमारे तीन फूट उंचीवर असून त्यांनी झाडावर चढून फाशी घेतलेल्या अवस्थेत खाली उडी घेतली असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी विषारी द्रव्याची एक बॉटल सुद्धा आढळून आली आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलाने अगोदर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा; परंतु नंतर दोघांनीही झाडावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप कळाले नाही. सदर प्रकरणाचा तपास चालू असून प्राथमिक तपासात सदर घटना प्रेमप्रकरणातून झाले असण्याची शक्यता औंढा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Trending