आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेमंड - द कम्प्लीट मॅन'च्या 'इनकम्प्लीट मॅन 'कथेतील दोन मुख्य पात्रे समोरासमोर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कम्प्लीट मॅन'ने इनकम्प्लीट मॅन'च्या दिशेने वळसा घेतलेल्या घराण्याची ही कथा चर्चेत आहे. द कम्प्लीट मॅन'च्या टॅगलाइनने प्रसिद्ध टेक्सटाइल कंपनी रेमंडचा कारभार लाला कैलाशपत सिंघानिया यांनी १९८० मध्ये पुत्र विजयपत यांच्याकडे सोपवला. हार्वर्डमध्ये शिक्षण झालेल्या विजयपत यांनी वडिलांची अपेेक्षा पूर्ण केली. ३५ वर्षांनंतर विजयपत यांनी २०१५ मध्ये कंपनीची सूत्रे पुत्र गौतम यांच्याकडे सोपवली. मात्र, या काळात गौतमने अपेक्षाभंग केल्याची भावना विजयपत यांच्या मनात आहे. परिस्थिती एवढी विकोपास गेली की, त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक द इनकम्प्लीट मॅन' ठेवावे लागले. पुस्तकात आपल्याविरुद्ध राग व्यक्त होईल, असे वाटल्याने गौतम त्याविरुद्ध हायकोर्टात गेले. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. 

 

५००० कोटींची कंपनी देऊनही आदर करत नाही : विजयपत 
८१ वर्षीय विजयपत हा युक्तिवाद फेटाळत, भरल्या आवाजात म्हणाले , ५ हजार कोटींची कंपनी मुलाला दिली. किमान त्याने आदर तर केला पाहिजे. मी एक पैसा मागितला ना त्याने दिला. माझ्यावर दया करावी, असे म्हणत नाही, कायदेशीर अधिकार मागत आहे. मी न्यायालयात आई-वडील व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम-२००७ अंतर्गत मुलाला दिलेली मालमत्ता परत देण्यासाठी कोर्टाला विनंती केली आहे. सध्या सुनावणी सुरू आहे. 

 

गौतम जे बोलले ते बोलले. मी संपत्ती मुलीला देईन, फेकून देईन की धर्मादाय संस्थेला देईन. मी माझी पूर्ण संपत्ती मोठ्या मुलास देईन, असेही होऊ शकते. गौतमला याच्याशी काही देणे-घेणे नसायला पाहिजे. त्यामुळे तो माझ्या मुलीबाबत जे काही बोलत आहे ते निराधार आहे.' 

 

विजयपत म्हणाले, गौतमशी कधी तडजोड होऊ शकत नाही. ज्या दिवशी तो वडिलांचा आदर करेल, त्या दिवशी अवश्य होईल. त्याने माझ्याबाबत कसे अपशब्द वापरले याची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्याने वापरलेले शब्द मी सांगू शकत नाही. कोणताही सभ्य मुलगा आपल्या वडिलांबाबत असे शब्द वापरू शकत नाही, एवढे मी सांगू शकतो. 

 

गौतम म्हणाले, मी व माझ्या वडिलांनी एकत्र बसून करारपत्र परस्पर संमतीने तयार केले आहे. मी या करारपत्रावर सुरुवातीस स्वाक्षरी करण्यास तयार आहे. याशिवाय तडजोडीचा हा करार एखाद्या सक्षम व्यक्तीस देण्यास तयार आहे, ज्यांच्याकडून माझ्या सकारात्मक पुढाकाराच्या उत्तरावर माझ्या वडिलांचीही स्वाक्षरी संबंधित करारावर घेऊ शकतील. 

 

वडिलांचे आरोप तुच्छ, हास्यास्पद, बेजबाबदार : गौतम 
गौतम म्हणाले, वडिलांसोबतचा वाद सोडवण्याचे अनेक प्रयत्न झाले. आजही माझे प्रयत्न आहेत. मात्र, सकारात्मक उत्तर मिळत नाही. वडिलांकडून माझ्यावर गलिच्छ, हास्यास्पद, निराधार व बेजबाबदार आरोप केले जाताहेत. मला याच्या खूप वेदना झाल्या. जेके हाऊसमध्ये ड्युप्लेक्स फ्लॅटची वडिलांची मागणी मी नव्हे, कंपनीच्या समभागधारकांनी फेटाळली आहे. मी रेमंडचा चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आहे. समभागधारकांप्रती माझे उत्तरदायित्व आहे. 

माझे वडीलही प्रकरण सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवू इच्छितात. मात्र, माझी बहीण व काही लोक वाद मिटवू देत नाहीत. भगवान बालाजीवर माझी खूप श्रद्धा आहे. त्यावरही टिप्पणी केली जात आहे.' मी जे सांगतोय ते खोटे आहे, हे गौतम यांनी भगवान तिरुपतीची तसबीर हातात घेऊन सांगावे, यानंतर मी खटला मागे घेईन,असे विजयपत म्हणाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...