आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलियन्सना भेटण्याच्या नादात या दोन तरुणांनी गमावला होता जीव, आजही कोडे बनलीये ही घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियो डी जेनेरियो - ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये अनेक वर्षांपूर्वी एक घटना घडला आहे. या घटनेमुळे एलियन्सच्या अस्तित्वाबाबद अनेक प्रश्न निर्माण होतात. असे समजले जाते की, 17 ऑगस्ट 1966 ला येथे राहणाऱ्या दोन व्यक्तींनी एलियन्सना भेटण्याचा मार्ग शोधला होता. इलेक्ट्रीकल इंजिनीअर असलेले हे दोघे काहीतरी सामान खरेदी करण्याचे सांगून गेले होते, पण ते कधीही परतले नाही. त्यांची डेडबॉडी ज्या अवस्थेत आढळली ते पाहून तपास पथकही हैराण होते. 


मॅनुअल परेरा आणि मिगुल जोस चांगले मित्र होते. 17 ऑगस्टला ते दोघे घरातून निघाले. महत्त्वाचे सामान खरेदी करण्यासाठी रिओ दी जेनेरियोला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा गेले ते परत आलेच नाही. कुटुंबीयांनी पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची बातमी दिली. तीन दिवस त्यांच्याबाबत काहीही समजले नाही. पण 20 ऑगस्टला विंतामच्या डोंगरांवर त्यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. 

 

असे वाटत होते जणून झोपलेत 
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की मॅनुअल आणि मिगुल यांच्या डेडबॉडी सडल्या होत्या. पण पण त्यांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेत किंवा संघर्षातून झाला असावा असे वाटत नव्हते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणते त्यांच्या डोळ्यांवर चष्म्यासारख्या लोखंडी पट्ट्या होत्या.

 

पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून बसला धक्का 
पोलिसांना आधी वाटत राहिले की, दोघांची हत्या करण्यात आली आहे, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्वकाही स्पष्ट झाले होते. दोघांच्या शरीरावर काहीही जखमा नव्हत्या. दोघांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. पण दोघांना एकाटवेळी हार्ट अटॅक कसा आला हा प्रश्न पोलिसांसमोर होता. डेडबॉडीडवळ सापडलेल्या अनेक वस्तूही प्रश्न उपस्थित करणाऱ्या होत्या. जवळच एक डायरी सापडली. त्यात एक कॅपसूल खाण्याच्या आणि कशाची तरी वाट पाहण्याच्या बाबतीत लिहिलेले होते. 


दोघांसाठी तयार केले होते लोखंडी चष्मे 
त्यांच्या डोळ्यांवर लावलेल्या पट्ट्या जेव्हा कुटुंबीयांना दाखवल्या तेव्हा त्यांनी त्या पट्ट्या ओळखल्या. दोघांनी काहीतरी प्रयोग करण्यासाठी या पट्ट्या तयार केल्या होत्या असे सांगण्यात आले. 


दोघांना होता एलियन्सच्या अस्तित्वावर विश्वास 
मॅनुअल आणि मिगुल यांना एलियन्सवर विश्वास होता असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यावर पोलिस आश्चर्यचकित झाले. दोघे एलियन्सना भेटण्याच्या प्रयत्नात मारले गेले असेही काहीजण म्हणाले. काही तज्ज्ञांच्या मते दोघांचा मृतदेह आढळलेले ठिकाणा पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीज करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दोघे काहीतरी अनुभव घेण्यासाठी याठिकाणी आले असावेत आणि भीतीपोटी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यताही काही जणांनी व्यक्त केली. 

 

ड्रग्ज आणि एलियनचे कनेक्शन?
52 वर्षांपूर्वी झालेल्या या मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नाही. काही लोक यहा ड्रग्ज ओव्हरलोडचा प्रकार असल्याचे म्हणत आहेत. एक खास प्रकारचे ड्रग्ज घेऊन दोघे एलियन्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण ओव्हरडोसने त्यांचा मृत्यू झाला असेही अनेकजण म्हणतात. अशा अनेक अफा आजही आहेत, पण सत्य कोणालाही माहिती नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...