आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरात मुस्लिम तरुणी देताहेत संस्कृतचे धडे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
नाजमीन आणि नौशीन खान. - Divya Marathi
नाजमीन आणि नौशीन खान.

नागपूर : जगातील सर्वात प्राचीन भाषा म्हणून ओळख असलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शिवाय या भाषेचे जतन व्हावे म्हणून भारतात शालेय, महाविद्यालयीन तसेच इतर विद्यापीठ स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रक्रियेत संस्कृतची आवड असलेल्या नागपुरातील सेंट पाॅल शाळेतील दोन मुस्लिम भगिनी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनाही त्या दोघींनी सोडून इतर कोणी संस्कृत शिकवलेले आवडत नाही.

शिक्षण सुरू असताना दोघींना संस्कृतबद्दल आवड निर्माण झाली. आज मोठी बहीण नाजमीन खान हुडकेश्वर स्थित सेंट पाॅल काॅन्व्हेंट येथे आणि धाकटी बहीण नौशीन खान आसोली येथील के. जाॅन स्कूल येथे संस्कृत शिकवते. दोघींनीही संस्कृतमध्ये एम. ए. आणि बीएडही संस्कृत भाषा घेऊन केले. आई-वडिलांनीही यात त्यांना सहकार्य केले. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षिका म्हणून संधी मिळाली, असे नाजमीन खान यांनी सांगितले.

सक्करदरा येथील श्री बिंझाणी महिला महाविद्यालयातून दोघींनीही संंस्कृतमध्ये एम. ए. केले. तिथे प्राध्यापक मृदुला नासेरी यांनी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खूप मदत केली, असे नाजमीन यांनी सांगितले.

लोकांना आश्चर्य वाटायचे

संस्कृत साहित्यात रामायण, महाभारत, भगवद्गीतेचा समावेश आहे. अनेकदा पुस्तक खरेदीसाठी बुकस्टाॅलवर जावे लागायचे. कोणत्याही बुकस्टाॅलवर हिंदू ग्रंथ मागताच बुरख्यातील महिला पाहून विक्रेते तसेच आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटायचे. पण, संस्कृतच्या आवडीविषयी स्पष्टपणे सांगितले की सगळे जण कौतुक करायचे.

श्लोक मुखोद्गत
अकरावीत पहिल्यांदा सस्कृत विषय घेतला. एकेका शब्दाचा अर्थ समजावून घेत शिकल्यामुळे फायदा झाला. हे श्लोक नंतर मुखोद््गत झाल्याचे नाजमीन म्हणाली.

घरीच घेतले वर्ग

शाळेत शिकवत असतानाच लग्न झाले. दरम्यान, बाळंतपणासाठी रजेवर होते. त्या वेळी विद्यार्थ्यांचे बारावीचे वर्ष होते. तेव्हा या विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिकवता यावे म्हणून माझ्या पतींनी एक हाॅल दिला. मी संस्कृत शिकवत असताना सासरचे लोक हाॅलबाहेर थांबून मी काय शिकवते, हे आश्चर्याने पाहत. सासू मला पंडिताईन म्हणायची, असे नाजमीन यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...