आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता \'गेटवे ऑफ इंडिया\' आणि \'मरीन ड्राइव्ह\' बीचवर घेता येणार क्रूझचा आनंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई-गोवा दरम्यान सुरू झालेल्या Angriya क्रूझ सर्व्हीमुळे मुंबईमध्ये क्रूझ सर्व्हीसाठी लोकांचा खूप उत्साह दिसत आहे. 20 ऑक्टोबर रोजी Angriya क्रुझची सुरूवात करण्यात आली. या क्रुझची 80 टक्के बुकिंग 15 डिसेंबरपर्यंत फुल झाली आहे. मुंबईतील क्रुझची मागणी पाहता मुंबई पोर्ट ट्रस्ट दोन नवीन क्रूझ सर्व्हीस सुरू करणार आहे. ही सर्व्हीस डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल, गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन दरम्यानस सुरू करण्यात येणार आहे. 
 
मरीव ड्राइव्ह येथे बनणार पॅसेंजर टर्मिनल

> मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटिया यांनी सांगितले की, ही सर्व्हीस डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल येथून सुरू होणार असून गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राइव्ह पर्यंत असणार आहे. त्यानंतर ती पुन्हा ती परत येणार आहे. यासाठी मरीन ड्राइव्हवर 150 मीटर लांब पॅसेंजर टर्मिनल तयार करण्याची योजना आहे. यामध्ये बीएमसीची मदत घेतली जाणार आहे. योजनेनुसार 425 स्वेअर मीटर जागा असलेल्या बिर्ला केंद्र येथील जमिनीवर हे टर्मिनल उभारण्यात येणार आहे. 


मुंबईत सुरू होणार इतरही सुविधा
> महाराष्ट्र शासन वाटर-ट्रांसपोर्टला प्रोत्साहन देत आहे. मुंबई पोर्ट ट्रान्सपोर्टने नुकतीच मुंबई-गोवा क्रूझ सर्व्हीस सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते क्रुझला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय पोर्ट ट्रस्ट ईस्टर्न वॉटरफ्रंट प्रकल्पावर काम सुरू आहे. हे एक किलोमीटर क्षेत्रात सुविधा प्रदान करणार आहे. याला रो-रो सर्व्हीस नाव देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना फक्त 5 रूपये दर आकारण्यात येणार आहे. 


पुढे वाचा...... कसे असणार हे क्रूझ

 

बातम्या आणखी आहेत...