आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये आयपीएलवर सट्टा घेणारे दोन ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोन जणांना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री बुंदेलपुरा भागात छापा टाकून ताब्यात घेतले.   


सध्या आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामने सुरू आहेत. या सामन्यांवर बीड शहरात सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने शहरातील बुंदेलपुरा भागातील सुजित बुंदेले याच्या घरी छापा टाकला. या वेळी आयपीएल सामन्यांवर मोबाइलवरून सट्टा घेणारे सुजित बब्रुवाहनसिंग  बुंदेले व अमित  अग्रवाल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा मोबाइल, लॅपटॉप व रोख रक्कम असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...