आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पीटलमध्ये भर्ती असलेल्या दोन पेशंटचा कबूतरामुळे झाला मृत्यू, रूग्णलयातील कर्मचारी झाले हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ग्लासगो : स्कॉटलँड येथील एका फेमस हॉस्पिटलमध्ये दोन रूग्णांच्या मृत्यूनंतर गदारोळ माजला होता. पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण समजल्यानंतर तेथील कर्मचारी विश्वास बसला नाही की असे कसे होऊ शकते. दोन्ही रूग्णांचा कबूतरच्या विष्ठेने होणाऱ्या इंफेक्शनमुळे मृत्यू झाला होता. प्रकरण समोर आल्यानंतर रूग्णालय व्यवस्थापनाने तपास सुरु केला आहे. हे दोन रूग्ण क्रिप्टोकोकस नावाच्या फंगसच्या संपर्कात आलेच कसे हे कोणालाच समजत नव्हते. 

 

रूग्णांपर्यंत कशी पोहोचली कबूतरची विष्ठा...

> ही घटना नुकतीच ग्लासगोच्ये क्वीन एलिजाबेथ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमद्ये घडली. येथे भर्ती करण्यात आलेल्या दोन रूग्णांचा क्रिप्टोकोकस नावाच्या फंगल इंफेक्शनमुले मृत्यू झाला. हे इंफेक्शन मुख्यतः कबूतरच्या विष्ठेतून पसरते. 

> क्रिप्टोकोकसचे दोन प्रकरणे समोर आल्यानंतर रूग्णालयात पुन्हा एकदा स्वच्छता संबंधित सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोबतच ग्लासगोच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाला गांभीर्याने घेत चौकशी सुरु केली. 

> इतक्या मोठ्या रूग्णालयात रूग्ण कबूतरच्या संपर्कात आलेच कसे हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. तपासणीदरम्यान वार्डच्या खूप दूर अंतरावर हॉस्पिटलच्या नॉन पब्लिक भागात कबूतरांची विष्ठा मिळाली होती. तिला आता साफ करण्यात आले आहे. 

> स्टाफचे म्हणणे आहे की, साधारणतः कबूतर कोणाला काहीच नुकसान पोहचवत नाहीत आणि दुर्मिळ प्रकरणांतच मनुष्यांना त्यांच्यापासून एखादा रोग पसरत असतो. गोपनीयतेमुळे रूग्णालयाकडून रूग्णांबाबत जास्त माहिती मिळाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...