आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Patients Were Forced To Share A Bed During Check Up In Govt Hospital In Indore

लाजिरवाने; सरकारी हॉस्पीटलमध्ये एकाच बेडवर महिला आणि पुरुषाला झोपवण्यात आले, व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- येथील सगळ्यात मोठ्या सरकारी महाराजा यशवंतराव हॉस्पीटलमध्ये एक्स-रे काढण्यासाठी एक महिला आणि एका पुरुषाला नेले जात होत. ते दोघे एकमेंकांना ओळखतही नव्हते, तरीदेखील त्यांना यावेळी बळजबरीने एकाच स्ट्रेचरवर झोपवण्यात आले. 


खंडवा जिल्ह्यातील पंधानाची रहिवासी संगीताला 12 दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाल्यानंतर एमवाय हॉस्पीटलला रेफर करण्यात आले होते. तिच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि दुसऱ्या मजल्यावरील आर्थोपेडिक्स विभागातील एका वार्डात भर्ती केले होते.


महिलेचा पती धर्मेंद्रने सांगितले की, "माझी पत्नी संगीताला आर्थोपेडिक वार्डात भर्ती केले होते. स्ट्रेचर कमी असल्याचे कारण सांगत, तिला एका पुरुष रुग्णासोबत एकाच स्ट्रेचरवरून काही टेस्ट करण्यासाठी घेऊन जाण्यात आले. आम्ही असहाय्य होतो, आम्हाला उपचार महत्त्वाचा होता त्यामुळे आम्ही त्यांना एकाच स्ट्रेचरवरून नेण्याची परवानगी दिली..''


त्यांनी पुढे सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना दिलेला वेळेत जाण्यस सांगितले, कारण ते डॉक्टर त्यांची वेळ संपल्यावर थांबत नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉस्टीटलचे आरोग्य अधिक्षक डॉ. पी.एस. ठाकुरने डॉक्टर, नर्स आणि वार्ड बॉयसहित ऑर्थोपेडिक विभागातील कर्मऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...